Jayant Patil On BJP | ”राम मंदिर कोणत्याही एका पक्षाची प्रॉपर्टी नाही”, निमंत्रणाच्या राजकारणावरून जयंत पाटलांची भाजपावर टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil On BJP | भाजपाने विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) उद्घाटनाचे निमंत्रण न दिल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर (Jayant Patil On BJP) टीका केली. ते शेतकरी आक्रोश मोर्चात (Shetkari Aakrosh Morcha ) बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, बाबरी मशिदीच्यावेळी (Babri Masjid) स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जबाबदारी घेतली. ते धाडसी होते, विशेष म्हणजे याची जबाबदारी भाजपमधील कुणीही घेतली नव्हती. आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाला निमंत्रित करायला हवे होते. राम मंदिर कोणत्याही एका पक्षाची प्रॉपर्टी नाही.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दिलेल्या आव्हानावर नाव न घेता जयंत पाटील म्हणाले, देशात आणि राज्यात अनेक खासदार गेल्या दोन-तीन वर्षात संसदेत अनेक प्रश्नांची मांडणी करतात, परंतु सर्वात जास्त प्रभावी मांडणी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची आहे, आज काही लोक अमोल कोल्हे यांना पराभव करायचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना घरा-घरात पोहचवले त्यांना पराभूत करणे सोपे नाही. (Jayant Patil On BJP)

जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आव्हान दिले पण यात दुरुस्ती व्हायला हवी अशी अपेक्षा आहे.
संभाजी महाराज (Sambhaji Maharaj), शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची खरी ओळख अमोल कोल्हेंनी
जनतेला करून दिली. अमोल कोल्हे या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन
फिरायचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | लाच स्वीकारताना ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

डंपरच्या अपघातात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; नागरिकांनी डंपर पेटविला, मंतरवाडी परिसरातील घटना (Video)

Pune Traffic Updates | कोरेगाव भिमा – पेरणे फाटा: विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल