Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट ओळखपत्र देऊन आयफोन व लोन घेऊन बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | एका व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे (Fake Documents) सादर करुन आयफोन (iPhone) खरेदी केला. तसेच कर्ज घेऊन बजाज फायनान्स कंपनीची (Bajaj Finance Company) 1 लाख 79 हजार 894 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 31 मार्च ते 8 जुलै 2023 या कालावधीत मगरपट्टा येथील सीझन मॉल मधील (Season Mall) व्हिनस डेटा एफ येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी बजाज फायनान्स कंपनीचे युनिट मॅनेजर युवराज चंद्रकांत मोरे Unit Manager Yuvraj Chandrakant More (वय-35 रा. बीटी कवडे रोड, मुंढवा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 420, 409, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रंजन सिंग यांनी बजाज फायनान्स कंपनीकडे तक्रार केली आहे.
आरोपीने विजय सिंग यांच्या नावाने बनावट ओळखपत्र सादर करुन त्या द्वारे कंपनीकडून 60 हजार 813 रुपयांचे लोन
मंजूर करुन घेतले. या रक्कमेतून आरोपीने अॅपल कंपनीचा (Apple company) आयफोन खरेदी केला.
त्याचवेळी बजाजचे ईएमआय कार्ड वापरुन फ्लिपकार्ट (Flipkart) वरुन खरेदी केली. तसेच 1 लाख 19 हजार 081 रुपये
लोन घेऊन कंपनीची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे (API Barge) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Amol Kolhe | भाजपा-शिंदे-पवार गटावर अमोल कोल्हेंचा निशाणा, ”रामायणात सीतामाईचं, तर कलियुगात पक्ष-चिन्हाचं अपहरण”

IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Pune Municipal Corporation (PMC) | अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ 11 जणांवर गुन्हा दाखल करा, पुणे मनपाचे भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त