Pune Traffic Updates | धोकादायक साधू वासवानी पूल पाडणार, शनिवारपासून वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | साधू वासवानी उड्डाणपूल (Sadhu Vaswani Flyover) धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल वेगवेगळ्या यंत्रणांनी पुणे महानगरपालिकेला Pune Municipal Corporation (PMC) दिला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल कमकुवत झाल्याने पुणे महानगरपालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूने हाईट बॅरीअर टाकून या पुलावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. (Pune Traffic Updates)

साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. सध्या हा पूल कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याकरीता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर 6 जानेवारी पासून पुढील 10 ते 15 दिवस प्रायोगिक तत्वावर वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. (Pune Traffic Updates)

नगर रोड, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, कौन्सील हॉल, मोरवाडा या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. काही रस्त्यावर एकेरी वाहतुक तर काही रस्त्यावर नो एन्ट्री करण्यात येणार आहे (Sadhu Vaswani Bridge). याबाबतची सविस्तर माहिती पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग (Pune Police Traffic Branch) जाहीर करणार आहे, असे पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर (Executive Engineer Abhijit Ambekar) यांनी कळवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांना का द्यावं लागलं स्पष्टीकरण? ”बाहेर असल्याने शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही कुणी गैरअर्थ…”

घर मालकाकडून भाडेकरु महिलेचा विनयभंग, धनकवडी परिसरातील घटना

Shiv Sena MLA Aaditya Thackeray | महाराष्ट्राला आदित्य ठाकरेंचं खुलं पत्र, केंद्र आणि राज्याच्या कारभारावर ओढले आसूड, ”गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय…”

लंडन ते मुंबई प्रवासात 152 ग्रॅम सोने गायब, पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल

Pune BJP Office | पुणे: डीपी रस्त्यावर भाजपचे नवीन शहर कार्यालय

Ajit Pawar | अजित पवारांवर ‘या’ युवा नेत्याचा हल्लाबोल, ”सत्तेत नसतात तर तुमच्यासोबत ५ आमदारही आले नसते”

Shiv sena Chief Uddhav Thackeray | सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी पैसे नाहीत : उद्धव ठाकरे