Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार, येरवडा परिसरातील घटना; दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने दोन सराईत गुन्हेगारांनी गाडीची तोडफोड करुन एकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. ही घटना 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सडेसहाच्या सुमारास येरवडा येथील करुणा हौसींग सोसायटीत घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या घटनेत अंकुश राम शिंदे (वय-47 रा. करुणा हौसींग सोसायटी, येरवडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी शनिवारी (दि.30) येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन समीर शेख व उबेद (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 307, 452, 323, 504, 506, 427, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश शिंदे यांचा मुलगा आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शिंदे यांचा मुलगा आरोपींसोबत बोलत नसल्याने व त्यांच्यासोबत राहत नसल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरुन आरोपींनी शिंदे यांच्या मुलाला शिवीगाळ केली होती. याचा जाब अंकुश शिंदे यांनी विचारला होता. याचा राग आरोपींना आला. बुधवारी (दि.27) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी घरासमोर लावलेल्या गाडीची तोडफोड केली. तसेच शिंदे यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी घरात गेले असता आरोपींनी घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.
यानंतर हतातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक होले (PSI Hole) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ब्युटी पार्लरमध्ये महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR; हडपसर परिसरातील प्रकार

तरुणीची छेड काढून आईला बेल्टने मारहाण, वडगाव शेरी परिसरातील घटना

नातवाकडून आजीला दगडाने मारहाण; धनकवडीमधील घटना

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला अटक; वडगाव शेरी परिसरातील घटना