Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : सराईत वाहन चोराला अटक, चार दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | देहूरोड परिसरात वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या चोरट्याला देहूरोड पोलिसांनी अटक (Dehu Raod Police) केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून एक लाख 65 हजार रुपये किमंतीच्या चार दुचाकी जप्त करुन चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई देहूरोड येथील शिवाजी विद्यालयाजवळ करण्यात आली. रविंद्र सुरेश सातोळे (वय-19 रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत चंद्रकांत इरन्ना तलारी यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तलारी यांनी त्याची दुचाकी स्वामी चौकातील ब्रीज खाली उभी केली होती. तेथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 29 मार्च रोजी घडला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार मोहसीन अत्तार व शुभम बावणकर यांना माहिती मिळाली की एक जण चोरीची दुचाकी घेऊन शिवाजी विद्यालयाजवळ थांबला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी माहितीच्या आधारे त्याठिकाणी जाऊन रविंद्र सातोळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील दुचाकी जप्त करुन अधिक तपास केला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक तपास केला असता देहुरोड पोलीस ठाण्यातील दोन आणि वाकड पोलीस ठाण्यातील एक असे तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बाप बांगर,
सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते,
संतोष जाधव, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव,
मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, सागर पंडीत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक