Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : भांडण सोडवल्याच्या रागातून घरात घसून मारहाण, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | भांडण सोडवल्याचा राग मनात धरुन तिघांनी जबरदस्तीने घरात घसून तरुणाला व त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाचाणे येथे घडला आहे.

दत्तात्रय येवले व सौरभ दत्तात्रय येवले (वय-25 रा. पाचाणे, ता. मावळ) हे जखमी झाले असून सौरभ याने याबाबत सोमवारी (दि.26) शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मंथन कदम (वय-22), संदेश कदम (वय-24 दोघे रा. पाचाणे, ता. मावळ) यांना अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलावर आयपीसी 323, 326, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे वडील रविवारी रात्री घरात असताना आरोपी जबरदस्तीने घरात घुसले. तु आमच्या भांडणात का पडला, तु सोडवासोडवी का केली असे म्हणत आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचे वडील दत्तात्रय येवले हे गंभीर जखमी झाले आहेत. तर फिर्यादी सौरभ याच्या डोक्याला मार लागला लागला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोहेकर (PSI Lohekar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chakan Murder Case | चाकणमध्ये अल्पवयीन मित्राचा खून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; दोन अल्पवयीन ताब्यात

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका