Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | भोसरी परिसरातील पीएमपीएमएल बस स्टॉप (Bhosari PMPML Bus Stop) व एसटी बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने चोऱ्या (Robbery Case) करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून भोसरी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आणून चार लाख 22 हजार रुपये किंमतीचे 72 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime)

मोहन गणेश जाधव (वय-32 रा. केशवनगर, संभाजी चौक, मुंढवा मुळ रा. शास्त्री नगर झोपडपट्टी, अंबरनाथ, मुंबई) व शिवराज अर्जुन वाडेकर (वय-25 रा. मस्जिद जवळ, पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींनी नाशिक फाटा बस स्टॉप, पीएमटी बस स्टॉप भोसरी या परिसरातुन गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीच्या घटनांना पायबंद घालून सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी भोसरी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलींग करीत आहेत. पथकाने चोरी झालेल्या घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

बुधवारी (दि.13) तपास पथक भोसरी परिसरातील गर्दीच्या व रहदारीच्या ठिकाणी खाजगी वाहनाने पेट्रोलींग
करत पीएमटी चौक भोसरी येथे आले असता, भोसरी बस स्टँड शेजारी दोन जण संशयितरित्या थांबल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता भोसरी पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहायक पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे
सहायक पोलीस फौजदार राकेश बोयने, पोलीस अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे,
प्रतिभा मुळे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे,
तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”

Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | बारमती मतदारसंघात 7 मे तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी होणार मतदान

IAS Rajendra Bhosale | सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार – नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले