Pune Pimpri Chinchwad Police News | प्रियकराचा सोबत राहण्यास नकार, फोटो डिलीट करण्यास सांगितल्याने प्रेयसीला मारहाण; येरवडा येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Police News | प्रियकराने सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रेयसीने (Girlfriend) मोबाईल मधील फोटो डिलीट करण्यास सांगितले. याचा राग आल्याने प्रियकर त्याची पत्नी व आईने तरुणीला बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केल्याची घटना येरवडा येथे घडली आहे. हा प्रकार येरवडा येथील जयजवान नगर येथे बुधवारी (दि.20) घडला असून पोलिसांनी (Pune Police) तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Police News)

याबाबत घाटकोपर (पूर्व) येथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अमोल विलास गणगे (वय-31) याच्यासह त्याची पत्नी व आईवर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Police News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी अमोल गणगे यांच्यात प्रेम संबंध (Love Affair) असून त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. त्यामुळे अमोल याने फिर्यादी यांना सोबत राहणार नसल्याचे सांगितले. याचा जाब फिर्यादी यांनी अमोल याच्याकडे विचारला. तसेच अमोल याच्या मोबाईल मध्ये दोघांचे असलेले फोटो डिलीट करण्यासाठी तिने मोबाईल मागितला. याचा राग आल्याने आरोपी यांनी तरुणीला प्लास्टीक पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | ”मराठा समाजाला पुन्हा लॉलीपॉप देण्याचा सरकारचा प्रयत्न”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर रिक्षाची ट्रॅव्हल्सला धडक, एकाचा मृत्यू

Pune Pimpri Chinchwad Police News | भागीदाराची पाच कोटींची फसवणूक, बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल; वारजे परिसरातील प्रकार

Pune Police MPDA Action | वारजे माळवाडी परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 73 वी स्थानबध्दतेची कारवाई

Benefits Of Raw Garlic | सकाळी अनोशापोटी कच्चा लसूण खाल्याने होतात जबरदस्त फायदे…