Pune-Pimpri Corona Updates | पुणेकर, पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा ! दिवसभरात 13 हजाराहून अधिक रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये कोरोना बाधित (Pune-Pimpri Corona Updates) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले होते. मात्र मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णसंख्येचा (New Patient) वाढता आलेख घसरताना पहायला मिळत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज (शुक्रवार) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 13 हजार 381 रुग्णांनी कोरोनावर (Pune-Pimpri Corona Updates) मात केली आहे.

 

जानेवारी महिन्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे दोन्ही शहरामध्ये निर्बंध (Restrictions) लागू करण्यात आले होते. मात्र आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) वाढल्याने दोन्ही शहर वासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज पुणे शहरात 8200 तर पिंपरी चिंचवडमध्ये 5181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होत असले तरी दैनंदिन रुग्णांची संख्या अद्यापही जास्त आहे. त्यातच ओमायक्रोनचे (Omycron) रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Pune-Pimpri Corona Updates)

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तसात 5635 रुग्णांचे निदान झाले आहे. दोन्ही शहरांत सध्या 60,288 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या जास्त असली तरी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. कोरोनाच्या महामारीत दोन्ही शहरामध्ये 9 लाख 70 हजार 266 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 8 लाख 96 हजार 934 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये काही जणांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

 

Web Title :- Pune-Pimpri Corona Updates | Great relief to Punekar, Pimpri-Chinchwadkar! More than 13,000 corona-free patients a day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Budget 2022 on Mobile App | तुम्हाला या मोबाईल अ‍ॅपवर संपूर्ण बजेट मिळेल, तुम्ही येथून डाउनलोड करू शकता

 

PMRDA Draft Development Plan | पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्यावरील सुनावणीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत; शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यासह माजी नगरसेवक अजित आपटे यांचा समावेश

 

Sambhaji Bhide | संभाजी भिडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘…तर मी मंत्रीपदावर थुंकतो, असं म्हणून एकही मंत्री बाहेर पडला नाही’