Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार ! 16 लाख रुपयांची केली फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) महिलेवर लैंगिक अत्याचार (Rape In Pune) करून तिच्याकडून 16 लाख 10 हजार रूपये उकळल्याचा (Cheating Case) धक्कादायक प्रकार घडला असून महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे नाव गिरीश भीमराव भोसले Girish Bhimrao Bhosale (वय 39, रा. उस्मानाबाद. मूळ रा. सोलापूर) आहे. (Pune Pimpri Crime)

 

गिरीश भीमराव भोसले शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून सदर महिलेला विवाहासाठी रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. भोसले याने गोड बोलून तिची 16 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केली. हा प्रकार 15 मार्च 2018 ते 14 मे 2022 या कालावधीत सुसगाव आणि तुळजापूर येथे घडला.

 

याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून विवाहासाठी रिक्वेस्ट पाठवली.
आरोपीने तो विवाहित असल्याचे फिर्यादीपासून लपवून ठेवले होते. (Crime Against Woman)

 

महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केला.
तसेच विश्वास संपादन करून वेळोवेळी 16 लाख 10 हजार रुपये घेतले. ते पैसे परत न देता फसवणूक केली.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 16 lakh cheated from a woman by rape shocking incident in pimpri chinchwad of pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘…तर तुम्हीही आमच्या कानात’

 

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

 

Ajit Pawar On Girish Mahajan | ‘देवेंद्र फडणवीस CM न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही फेट्याने डोळे पुसत आहेत’ – अजित पवार