Pune Pimpri Crime | देहूरोड येथे घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बचावासाठी मुलीने केला आरोपीवर चाकू हल्ला

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | घरात घुसून एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) चुकीच्या पद्धतीने स्पर्श (Bad Touch) करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना देहूरोड येथे घडली आहे. मुलीने स्वत: च्या बचावासाठी भाजी कापण्याच्या चाकूने आरोपीवर हल्ला (Knife Attack) करुन आपली सुटका करुन घेतली. हा प्रकार सोमवारी (दि.29) दुपारी दोनच्या सुमारास येलवाडी (Pune Pimpri Crime) येथे घडली.

 

याप्रकरणी अल्पवयीन मुलावर देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) 354, 323, 504, 506 व बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण कलमांतर्गत (Under the Protection of Children from Sexual Offence Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत 16 वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी घरात घुसला.
त्याने मुलीला शिवीगाळ करुन तिचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.
मुलीने त्याला विरोध केला असता त्याने मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली.
तिने आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी भाजी कापण्याच चाकू फेकून मारला.
त्यावेळी आजुबाजुचे लोक जमले. त्यांनी आवाज दिल्याने आरोपीने फिर्यादी मुलीला धक्का देऊन शिवीगाळ करत
जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन निघून गेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गावडे (API Gawde) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A minor girl was molested by entering the house at Dehurod, the girl attacked the accused with a knife in order to defend herself

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | TATA Group च्या 3 रुपयांच्या शेअरचा जबरदस्त रिटर्न, एक लाखाचे केले 169 कोटी

 

Beed Accident | दुर्देवी ! महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 9 वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू

 

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल