Pune Pimpri Crime | पळून जाणाच्या प्रयत्नात असलेल्या तडीपार गुन्हेगाराला भोसरी पोलिसांकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार (Tadipar) करण्यात आले असताना शहरात फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला (Criminal) पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांना (Pune Police) धक्का देऊन पळून जाण्याचा (Pune Pimpri Crime) प्रयत्न केला. ही कारवाई सोमवारी (दि.29) रात्री साडेआठच्या सुमारास दापोडी येथील स्मशानभूमी जवळ केली.

 

गणेश विष्णू अडागळे Ganesha Vishnu Adagale (वय-25 रा. बापू काटे चाळ, दापोडी) असे अटक करण्यात तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यातील (Bhosari Police Station) पोलीस कर्मचारी सागर आनंद जाधव Sagar Anand Jadhav (वय-32) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गणेश अडागळे हा सराईत गुन्हेगार आहे. पोलीस उपायुक्तांनी (DCP) त्याला 26 एप्रील 2022 रोजी पिंपरी चिंचवड शहर (Pimpri Chinchwad City), पुणे जिल्ह्यातून (Pune District) दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. आरोपीने पोलिसांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हद्दीत फिरत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांना धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले (PSI Jonapalle) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Bhosari police arrested a fugitive criminal who was trying to escape

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; लग्नाविषयी विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

 

Pune Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी, हवामान खात्याचा इशारा

 

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल