Pune Pimpri Crime | नवस फेडण्यासाठी दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | तुझ्यासाठी बुलेट घेतलीय, नवस फेडायला दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत गैरवर्तन करून तरुणीचा विनयभंग केला. हा प्रकार पिंपरी येथील नव महाराष्ट्र शाळेजवळ मंगळवारी (दि.29) सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत 17 वर्षांच्या पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आदित्य उर्फ सागर संजू जाधव (वय – 19, रा. पिंपरी) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड), 506, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलीस उपनिरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही नव महाराष्ट्र शाळेत इयत्ता
11 वीमध्ये शिकते. आरोपी हा ती राहत असलेल्या परिसरात राहतो.
बुधवारी सकाळी तरुणी कॉलेजमध्ये आली असता, आरोपी बुलेट गाडीवरून त्या ठिकाणी आला. त्याने तरुणीचा हात पकडून म्हणाला, ‘मी दगडूशेठ गणपतीला नवस केला आहे, मी जेव्हा नवीन बुलेट घेईन त्यावेळी माझ्या गाडीवर प्रथम तुला बसवून घेऊन येईन’, त्यावेळी तरुणीने हात झटकून सुटका करून घेतली. तरुणीने आरोपीला पाठलाग करू नकोस, अन्यथा शिक्षकांना सांगेन असे सांगितले. त्यावेळी ‘मी कोणाला घाबरत नाही, तू माझ्यासोबत चल नाही तर पळवून घेऊन जाईन,’ अशी धमकी देऊन गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | College girl molested by asking Dagdusheth to go to Ganesha to pay his vows

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’

Pune Crime | पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक; 5 कोटींचा मुद्देमाल जप्त