Pune Pimpri Crime | सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग, वडिलांची बाजू घेणाऱ्या पतीसह सासऱ्यावर FIR

तळेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पतीच्या विवाहबाह्य संबंधास (Extramarital Affair) विरोध केल्याने पती एका महिलेला घेऊन वेगळा राहिला. याचा फायदा घेत सासऱ्याने (Father-in-Law) सुनेकडे (Daughter-in-Law) शरीर संबंधाची मागणी केली. याबाबत पतीकडे तक्रार केली असता त्यानेही वडिलांची बाजू घेत महिलेला शिवीगाळ केली. पीडित महिलेने पोलिसांकडे (Pune Pimpri Crime) धाव घेत पती आणि सासऱ्या विरुद्ध तक्रार केली. हा प्रकार 2018 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

 

याबाबत 29 वर्षाच्या पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन 35 वर्षीय पती आणि 75 वर्षाच्या सासऱ्यावर आयपीसी 354, 354(अ), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून त्यांनी याला विरोध केला.
यावरुन पतीने पीडित महिलेला मारहाण, शिवीगाळ केली. त्यानंतर पती एका महिलेला घेऊन खेड येथे राहण्यास गेला.
त्यानंतर सासऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन (Abuse) केले. तसेच पती आणि तुझ्या नावावर असलेले कर्ज फेडतो असे सांगून महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली.
यासंदर्भात महिलेने पतीकडे तक्रार केली असता पतीने चारित्र्यावर संशय घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धापटे (PSI Dhapte) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Daughter-in-law molested by father-in-law, FIR against father-in-law with husband who sided with father

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का? – किरीट सोमय्या

Nimrit Kaur Ahluwalia | बिग बॉस स्पर्धक निमृत कौर अहलुवालिया डिप्रेशनमध्ये, समोर आलं धक्कादायक कारण…

Pune Crime | दुचाकीस्वार आणि पीएमपी चालकाची फ्रि स्टाईल हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल