Pune Pimpri Crime | पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील शिक्षकाचा पवना धरणात बुडून मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लोणावळा परिसरात कुटुंबासमवेत फिरायला आलेल्या मुंबईतील एका शिक्षकाचा पवना धरणाच्या (Pavana Dam) पाण्यात बुडू मृत्यू (Teacher Drowned) झाला. ही घटना (Pune Pimpri Crime) रविवारी (दि. 8) सकाळी अकराच्या सुमारास घडली. प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया Premprakash Roshanlal Bhatia (वय-62 रा. कुर्ला, मुंबई) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

 

भाटिया कुटुंबीय रविवारी पवना धरण परिसरातील दुधिवरे गाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. सकाळी अकराच्या सुमारास प्रेमप्रकाश हे पवना धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पोहत असताना भाटिया यांना दम लागल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील (Lonavala Rural Police Station) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहिम राबवण्यास सुरुवात केली. दरम्यान शिवदुर्ग संस्थेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. (Pune Pimpri Crime)

 

शिवदुर्गच्या पथकाने भाटिया यांना बेशुद्धावस्थेत पाण्यातून बाहेर काढले.
त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून
पोलीस हवालदार विजय गाले (Police Constable Vijay Gale) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | mumbai teacher dies after drowning in pavana dam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक