Pune Pimpri Crime News | मारहाण करुन नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; म्हाळुंगे परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | जीवे मारण्याच्या उद्देशाने एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात मारहाण करुन त्याचे कपडे काढून मोकळ्या जागेत नग्नावस्थेत सोडून दिले. त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mhalunge MIDC Police Station) अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत पोलीस शिपाई (Police Constable) अर्जुन रामचंद्र सोनटक्के (Arjun Ramchandra Sontakke) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी 302, 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.29) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत उघडकीस आली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे गावच्या हद्दीतील तळवडे पुलाकडे जाणाऱ्या रोड लगत तानाजी शिंदे यांच्या
वाहन पार्किंगच्या समोरील जागेत एक 30 ते 35 वयोगटातील व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आला.
आरोपीने त्याच्यावर टणक हत्याराने डोक्यावर व शरीरावर ठिकठिकाणी जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्याला नग्नावस्थेत सोडून दिले होते. पोलिसांनी या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर (Sr PI Vasantrao Babar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पत्नीचा राग लहान मुलीवर, जेवणात चिकन दिले नाही म्हणून मारली वीट; पाषाण परिसरातील घटना

Pune Navale Bridge Accident | वाहनाच्या धडकेत टेम्पो पलटी, तरुणाचा मृत्यू; नवले ब्रिज जवळील घटना

MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात