Pune Pimpri Crime News | ‘मी घरकुलाचा भाई आहे…’ दारुसाठी पैसे मागत टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, दुचाकीची तोडफोड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | ‘आम्ही आक्या बाँड टोळीचे सदस्य आहोत, मी घरकुलाचा भाई आहे’ आम्हाला दुरुसाठी पैसे दे म्हणत सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन दुचाकीची तोडफोड केली. तसेच जबरदस्तीने खिशाती पैसे काढून घेतले. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री साडे आठच्या सुमारास चिखली येथील घरकुल भाजी मंडईजवळ घडली. याप्रकरणी सात जणांवर चिखली पोलीस ठाण्यात (Pimpri Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत अभिषेक मुकेश कांबळे (वय -24 रा. अमृता हौसींग सोसायटी, अजंठा नगर, चिंचवड) याने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून मन्या कोरी, अतुल निसर्गंध, जुनेद नायकोडी, आकाश मस्के, बंडु महाकाल, सोहेल पठाण, हतोड्या भोसले व त्याचे इतर साथीदार (सर्व रा. चिखली घरकुल) यांच्यावर आयपीसी 395, 397, 504, 506, 427 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक कांबळे व त्याचे मित्र दुचाकीवरुन घरकुलमध्ये चायनिज टपरीसाठी जागा बघण्यासाठी गेले होते. जागा बघून अजंठानगरला जात असताना घरकुल भाजी मंडईसमोर आरोपी मन्या कोरी याने फिर्य़ादी यांची दुचाकी आडवली. त्याने अभिषेक कांबळे याला शिवीगाळ करुन ‘मी घरकुलाचा भाई आहे, तुम्ही मला ओळखत नाही का’ असे म्हणत दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तर अतुल निसर्गंध याने फटाक्यांची पेटती माळ कांबळे याच्या अंगावर टाकली. तर इतर साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना हाताने मारहाण केली. तसेच कांबळे याच्या दुचाकीवर दगड मारुन गाडीची तोडफोड करुन नुकसान केले. (Pune Pimpri Crime News)

आरोपी बंडु महाकाल व सोहेल पठाण यांनी फिर्यादी याच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करुन दोघांनी त्याला पकडले असता मन्य कोरी याने खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेतले. कांबळे याने त्याला विरोध केला असता मन्याने सिमेंटचा ब्लॉक व दगड मारुन गंभीर जखमी केले. तर आकाश म्हस्के याने चाकूने वार केला.

अभिषेक कांबळे जीव वाचवण्यासाठी शेजारी असलेल्या बिल्डिंगमध्ये पळला.
आरोपींनी त्याच्या मागे जाऊन त्याला तिसऱ्या मजल्यावर सिमेंट ब्लॉक व दगडाने तसेच बेल्टने मारहाण केली.
यावेळी मन्या कोरी याने ‘आम्ही बाँड टोळीचे आहोत, आक्या बाँड जेलमध्ये गेला, मी गँगचा लिडर आहे,
बाँड गँग माझी आहे, मी घरकुलाचा भाई आहे, कोणाला सांगायचे ते सांग,
मी भीत नाही’ असे म्हणत परत घरकुलामध्ये आला तर गेम करेन अशी दमदाटी करत
जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर (PSI Vivek Kumatkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray On Amit Shah | अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्याचा दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतला समाचार, राज ठाकरेंनी सुनावले

Pune Pimpri Crime News | घरगुती कारणावरुन वयस्कर आईचा खून, मुलाला अटक; देहूरोड परिसरातील घटना

‘आमच्या सोबत का फिरत नाही?’ म्हणत दोन तरुणांना मारहाण, आंबेगाव मधील घटना

Loksabha Election 2024 | कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण? मातोश्रीवर इच्छूकांची बैठक, हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?