Raj Thackeray On Amit Shah | अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्याचा दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतला समाचार, राज ठाकरेंनी सुनावले

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray On Amit Shah | तुम्ही ३ डिसेंबरला राज्यात भाजपाचे (BJP) सरकार बनवा, भाजपाकडून मध्य प्रदेश सरकार तुम्हाला आयोध्येत नेऊन प्रभू रामाचे दर्शन मोफत घडवेल, असे वक्तव्य भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभेत केल्याने त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. विशेष, म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray On Amit Shah) या दोन बंधूंनी देखील शाह यांच्या वक्तव्याला विरोध करत समाचार घेतला आहे. या मुद्द्यावर दोन्ही बंधूंचे सूर जुळल्याचे दिसत आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याला विरोध दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदा घेत शाह यांना सुनावले. तसेच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) पत्र पाठवून आचारसंहितेच्या नियमावलीत काही बदल केलेत का, अशी विचारणा केली आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, शाह यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचे नवीन खाते उघडले असावे. तुम्ही काय कामे केली त्यावर निवडणूक लढवा. राम मंदिर दर्शनाचे आमिष का दाखवत आहात? इतकी वर्ष तुम्ही तिथे सत्तेत आहात तुम्ही काय केले हे लोकांसमोर येणे गरजेचे आहे. तसेच साहेबने बोला है हरने को…हे उदाहरण देऊन ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली.

तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटले की, गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून ६ वर्ष त्यांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आज निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केले असावेत.

पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री धर्म, देवाच्या नावावर मते मागत असतील तर कदाचित निवडणूक आयोगाने
आचारसंहितेत बदल केला असावा. जर बदल केला असेल तर सर्व राजकीय पक्षांना ते अवगत करावे.
(Raj Thackeray On Amit Shah)

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अमित शाह यांनी, मध्यप्रदेशात जे भाजपाला मतदान
करतील त्यांना रामलल्लांचे दर्शन मोफत घडवू असे म्हटले आहे, त्यांनी केवळ मध्य प्रदेशापुरते
मर्यादित न राहता देशभरात रामभक्तांना जेव्हा वाटेल तेव्हा भाजपाकडून मोफत दर्शन घडवावे.

अमित शाह काय म्हणाले…


अमित शाह म्हणाले की, तुम्ही ३ डिसेंबरला राज्यात भाजपाचे सरकार बनवा,
भाजपाकडून मध्य प्रदेश सरकार तुम्हाला प्रभू रामाचे दर्शन मोफत घडवेल.
काँग्रेसने ७० वर्ष राम मंदिर लटकवले. टाळाटाळ केली. परंतु पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)
यांनी राम मंदिराचे भूमिपूजन केले. आज मंदिर निर्माण पूर्ण झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Loksabha Election 2024 | कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण? मातोश्रीवर इच्छूकांची बैठक,
हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?

Thackeray Group Leader Arrested | दादा भुसे यांचे कट्टर विरोधक असलेल्या ठाकरे गटाच्या
‘या’ नेत्याला अटक, प्रकरण नेमकं काय?