Pune Pimpri Crime | कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन केला बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कोल्ड्रिंक्स (Cold Drinks) मध्ये गुंगीकारक पदर्थ मिक्स करुन महिलेला बेशुद्ध केले. त्यानंतर नराधमाने तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) शुभम विनायक बने Shubham Vinayak Bane (वय-19) याच्यावर IPC 376 (2) (जे), 328, 342 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात (Pune Pimpri Crime) घेतले आहे.

याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि.23) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 1 ते 5 या कालावधीत मारुंजी कोलते पाटील (Marunji Kolte Patil), ता. मुळशी येथे घडला. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शुभम बने (वय-19 रा. रत्नागिरी-Ratnagiri) याला ताब्यात (Arrest) घेतले आहे.(Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांना म्हणाला की, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना गाडीवर बसवून मारुंजी कोलते पाटील येथील राहत्या घरी घेऊन गेला. त्यानंतर कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ मिक्स करुन महिलेला बेशुद्ध केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांना घरातून जाण्यास मज्जाव केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर (PSI Borkar) करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Crime | rape by ingesting narcotics in cold drinks

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त