Pune Pimpri Crime | अपघात झाल्याने टेम्पोचालकाचा गळा दाबून बेशुद्ध करुन दिले पाण्यात फेकून; हिंजवडी पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | भरधाव जाणार्‍या दुचाकीस्वाराने टेम्पोला धडक दिल्याने तो जखमी झाला. टेम्पोचालक त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. मात्र, त्याच्या नातेवाईकाने या टेम्पोचालकाला मारहाण (Beating) करुन त्याचा गळा दाबून बेशुद्ध केले. त्यानंतर पाण्यात फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. हा प्रकार म्हाळुंगे (Pune Pimpri Crime) गावात घडला.

 

याप्रकरणी रमेश बाळु पवार Ramesh Balu Pawar (वय 21, रा. अर्जुननगर, म्हाळुंगे-Mahalunge) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संकेत दिलीप शेडगे (Sanket Dilip Shedge), दिलीप शेडगे Dilip Shedge (रा. शिवाजी चौक, म्हाळुंगे) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.(Pune Pimpri Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश पवार हे टेम्पो चालक (Tempo Driver) असून 12 जुलै रोजी रात्री दहा वाजता ते घोटावडे फाटा येथे घरसामान सोडून घरी परत येत होते. घराजवळ आले असताना महालक्ष्मी देवी मंदिर चौकात ते इंडिकेटर दाखवून उजवीकडे वळत होते. त्यावेळी संकेत हा समोरुन दुचाकीवरुन आला. त्याने टेम्पोच्या पुढील बाजूस धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. तेव्हा रमेश पवार याने भावाला बरोबर घेऊन हॉस्पिटलला नेले.

त्याठिकाणी उपचार न करता संकेत व त्याचे वडील दिलीप शेडगे हे महालक्ष्मी मंदिर चौकात आले.
त्यांनी तुमच्या टेम्पोवर डायव्हर कोण होता, असे विचारल्यावर रमेश यांनी मी होतो असे सांगितले.
त्याबरोबर त्यांनी रमेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या चुलत भावाने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा दिलीप शेडगे याने त्यालाही मारहाण केली. संकेत याने रमेश याचा गळ्याला कवटाळून जोरजोराने गळा दाबला.
रमेश याला म्हाळुंगे गावाकडे ओढत नेऊ लागला. त्यावेळी रमेश यांच्या आई, भाऊ व आजी यांनी प्रतिकार केला.
तेव्हा त्याने रमेश यांचा गळा दाबून त्यांना पाण्यात फेकून दिले. त्यावेळी रमेश हे बेशुद्ध होऊन पाण्यात पडले.
तेव्हा त्याचा भाऊ व इतरांनी त्यांना बेशुद्धावस्थेतच औंध येथील मेडिपॉइंट हॉस्पिटल मध्ये (Medipoint Hospital Aundh) नेले. तेथे उपचार केल्यानंतर काही वेळाने ते शुद्धीवर आले. पोलिसांनी दोघा पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | The accident caused the tempo driver to be strangled and thrown into the water; FIR at Hinjewadi Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sairat Fame Actor Arbaj Shaikh | सैराटमधील सल्याला पुण्यातील रिक्षावाल्यानं लुटलं ?, शिवीगाळ अन् मनस्ताप…

 

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचे थैमान ! आगामी 2 दिवस पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

 

Nilesh Rane | ‘… तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत’ – निलेश राणे