Pimpri : ‘तो’ व्हिडिओ पाठवणार्‍या मित्रासह पतीविरोधात FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –   मिज्ञाने पॉर्नसाईटवरील व्हिडिओ तुझाच पत्नीचा आहे असे सांगून पतीला आणि त्याच्या कुटुंबीयांना व्हॉट्सवरून पाठवला. त्यानंतर तो पत्नीला त्रास ( pimpri-husband-harassed-his-wife-after-friend-sent-video-clip-on-mobile-phone)देऊ लागला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कलाटेनगर, वाकड परिसरात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला तिचा पती वारंवार चारित्र्याचा संशय घेऊन त्रास देत होता. त्यातच काही दिवसांपूर्वी पीडितेच्या पतीच्या मित्राने एक पॉर्न व्हिडिओ पीडितेच्या भावाला व्हॉट्सॲप वरून पाठवला. त्यानंतर हा व्हिडिओ घरातील अन्य सदस्यांनाही पाठवला. पीडितेच्या पतीने हा व्हिडिओ तुझाच आहे, असे म्हणत पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी तिने दोघांविरोधात तक्रार केली. वाकड पोलीस ठाण्यातील फौजदार संगीता गोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.