Pune PMC Action On Sarasbaug Chowpatty | सारसबाग चौपाटीवरील खाद्यपदार्थांचे 53 स्टॉल सील, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Action On Sarasbaug Chowpatty | शहरातील सारसबाग चौपाटी येथे विविध खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते सातत्याने नियमांचे उल्लंघन करत असल्याने शनिवारी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्व 53 दुकानांना सील ठोकले. सुट्टीच्या दिवशी ही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Pune PMC Action On Sarasbaug Chowpatty)

 

सारसबाग हे पुण्यासह बाहेरील नागरिकांच्या पसंतीचे ठिकाण असल्याने येथे रोज 2 ते 3 हजार नागरिक भेट देतात. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने सारसबागेत प्रचंड गर्दी होत आहे. सारसबागेला लागूनच चौपाटी असून, येथे फास्टफुड सेंटर, ज्यूस सेंटर, आइस्क्रीम पार्लरसह खेळण्यांची दुकाने अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून बिनदिक्कत चालवली जातात.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील 53 स्टॉलवर कारवाई करत ते सील केले. येथील विक्रेते स्टॉलच्या जागेपेक्षा जास्त जागा वापरत आहेत. स्टॉलसमोर शेड उभारून, फरशा टाकून हॉटेल थाटली आहेत. अनेकदा महापालिकेच्या कारवाईत राजकीय दबाव येतो.

 

महापालिकेत प्रशासक आल्यानंतर येथील स्टॉल समोरील सर्व अतिक्रमण पाडून टाकले होते.
तसेच प्रत्येक 15 दिवसांनी कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने यापूर्वी म्हटले होते.
तरीसुद्धा येथे पुन्हा अतिक्रमण करण्यात आल्याने शनिवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई करत 53 स्टॉलला सील केले आहे.

महापालिकेच्या या कारवाईमुळे सारसबाग चौपाटीवरील व्यवसाय ठप्प झाले.
ही कारवाई महापालिकेला सुट्टी असताना करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मात्र, सुट्टीच्या दिवशीही कारवाई करता येते, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

 

Web Title :- Pune PMC Action On Sarasbaug Chowpatty | 53 food stalls sealed at Pune PMC Action On Sarasbaug Chowpatty

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ketaki Chitale | पवारांविरोधातील पोस्टप्रकरणी केतकी चितळे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अंडी, शाईफेक

 

Headache In Summer | उन्हाळ्यात डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा

 

Heart Disease Risk By Your Blood Group | ‘या’ रक्तगटाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका असतो कमी

 

Ketaki Chitale | पवारांविरोधातील पोस्टप्रकरणी केतकी चितळे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अंडी, शाईफेक

 

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; स्मार्ट लायन्स्, ऑक्सिरीच स्मॅशर्स संघांची विजयी कामगिरी !