Pune PMC News | माजी नगरसेवकांकडून महापालिकेच्या मिळकतींचा बेकायदेशीररित्या ‘भाडेतत्वावर’ वापर सुरू ! प्रशासन ऍक्शन मोडवर; एका प्रकरणात गुन्हा तर दुसर्‍या प्रकरणात हॉल सील करण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्या वतीने Pune Municipal Corporation (PMC) विविध वापरासाठी विकसित करण्यात आलेल्या मिळकतींचा ‘माननीयांच्या’ मार्फत परस्पर वापर सुरू करण्यात आल्याने प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. कोंढव्यामध्ये एक ‘हॉल’ परस्पर काही रक्कम आकारून परस्पर भाड्याने देण्याचा ‘उद्योग’ निदर्शनास आल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime) करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर औंध येथील एक हॉल माननीयांनी परस्पर महिलां ‘कुस्ती’ प्रशिक्षणासाठी वापरात आणल्याने तो ‘सील’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune PMC News)

 

महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (Pmc Property Management Department) मागील काही महिन्यांपासून महापालिकेच्या मिळकतींच्या एकत्रित नोंदी घेण्यासाठी पावले उचलली आहेत. आतापर्यंत या विभागाने सुमारे साडेतीन हजार मिळकतींची नोंदणी केली आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून भवन रचना व क्षेत्रिय कार्यालयाकडून उभारण्यात आलेल्या अगदी छोट्या समाज मंदिरांपासून, शाळा, हॉस्पीटल, बहुद्देशीय भवन, व्यायामशाळा, विरंगुळा केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. (Pune PMC News )

 

दरम्यान, मागील काही महिन्यांत कामे पुर्ण झालेल्या ५७ मिळकती अद्याप मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. साधारणत: भवन रचना विभागाकडून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती वास्तू मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येते. मालमत्ता व्यवस्थापन विभाग महापालिकेच्या संबधित विभागाच्या मागणीनुसार ती वास्तू कागदोपत्री प्रक्रिया पार पाडून हस्तांतरीत केली जाते. मात्र, मालमत्ता विभागाच्याच ताब्यात न आलेल्या काही मिळकतींचा माननीयांच्यावतीने परस्पर वापर सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: आता नगरसेवकपद नसतानाही या मिळकतींचा व्यावसायीक वापर करत असल्याचे दिसून आले आहे. त्याविरोधात कडक पावले उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिले आहेत.

कोंढवा येथील हॉलचा भाडेतत्वावर वापर !
कोंढवा (Kondhwa) येथे एका माननीयांनी त्यांच्या निधीतून हॉल विकसित केला आहे. हा हॉल अद्याप मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात आलेला नाही. परंतू मागील चार महिन्यांपासुन संबधित माननीयांनी तो हॉल स्थानीक नागरिकांना लग्न कार्यांसाठी वापरास देण्यास सुरूवात केली आहे. याबाबत त्याच प्रभागातील दुसर्‍या पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारीची खातरजमा करुन आयुक्तांनी हा हॉल सील करायचे आदेश दिल्याने सर्वच माननीयांची पंचाईत झाली. अखेर नगरसेवकांनी आपसात ‘डील’ करत हॉलचे सील परस्पर काढून पुन्हा संगनमताने हॉलचा वापर सुरू केला. यामुळे आयुक्तांनी याप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने नगरसेवकांची (PMC Corporator) ‘धावपळ’ सुरू झाली आहे.

 

औंध येथील महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र
औंध प्रभागातील (Aundh Ward Prabhag) एका माननीयांच्या प्रयत्नांतून दीड हजार चौ. फूटांच्या आतील हॉल विकसित करण्यात आला आहे. या हॉलमध्ये संबधित माननीयांनी परस्पर महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. हा हॉल अद्याप मालमत्ता विभागाच्या ताब्यात आलेला नाही. तसेच दीड हजार चौ. फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असल्याने क्षेत्रिय कार्यालयाच्या अखत्यारीत हा हॉल येत असून चार महिन्यांपुर्वी सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्याचा दावा या माननीयांच्या पतीने केला आहे. वास्तविकत: या प्रस्तावाला आयुक्तांनी प्रशासकीय मान्यताच दिलेली नाही. त्यामुळे या हॉलचा बेकायदा वापर सुरू असल्याची तक्रार त्या माननीयांच्या पक्षातील पदाधिकार्‍याने केली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी संबधित हॉल सील करण्याचे आदेश दिले आहेत.

भवन रचना विभागाने विकसित केलेल्या वास्तू मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरीत केल्यानंतर २००८ सालच्या जागा वाटप नियमावलीनुसार त्यांचा वापर करण्यात येतो.
परंतू मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरीतच न झालेल्या ५७ मिळकतींचा परस्पर वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग
(- Rajendra Muthe, Deputy Commissioner, Property Management Department)

 

 

Web Title :- Pune PMC News | Former corporators start using municipal properties illegally on lease basis Administration on action mode Order to seal the hall in one case and crime in another

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा