Pune PMC News | ‘बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीचित्र लावल्यास एक हजार रुपये दंड, ‘फाईन’ न भरल्यास मिळकतींवर बोजा चढविणार’ – पुणे महापालिका

आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांची माहिती

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रके लावून विद्रुपीकरण करणार्‍यांविरोधात महापालिका प्रशासनाने आता अधिकच ‘कठोर’ भूमिका घेतली आहे. अशा बेकायदा जाहिरातींना प्रत्येक फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रकांसाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे (Fines for illegal banners, flex, hoardings in Pune). हा दंड न भरल्यास संबधितांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप (PMC Madhav Jagtap) यांनी दिली. (Pune PMC News)

 

शहरात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस तसेच जाहिरांतींचे बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्ती पत्रके मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात. यावर महापालिका कारवाई करून ते काढूनही टाकले जातात. यापुर्वी आकाशचिन्ह विभागाने शहर विद्रुप करणार्‍या अशा बेकायदा बॅनर आणि फ्लेक्स लावणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली होती. कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त १० फ्लेक्स, बॅनर लावणार्‍यांविरोधात कारवाई करताना एक हजार रुपये दंड आकारण्यात येत होता. परंतू यानंतरही असे फलक लावणार्‍यांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आता प्रत्येक फ्लेक्स आणि बॅनरसाठी एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिल्याचे आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. (Pune PMC News)

भित्तीपत्रक लावणार्‍यांवरही कारवाई
शहरात सार्वजनिक ठिकाणी छोट्या व्यावसायांची तसेच क्लासेसच्या जाहिरांतीची भित्तीपत्रक मोठ्या प्रमाणावर लावली जातात.
प्रामुख्याने सार्वजनिक सिमाभिंती, शौचालये, मुतार्‍या, विजेचे डी.पी.बॉक्स, बस स्थानके, विजेचे खांब आदींवर जागा मिळेत तेथे भित्ती पत्रके आणि छोटे फ्लेक्स अडकविले जातात.
चिटकवलेली भित्तीपत्रके काढण्याचे कामही जिकरीचे असते. यामुळे कितीही चांगली रंगरंगोटी केली तरी सार्वजनिक ठिकाणच्या भिंती या विद्रुपच झाल्याचे पाहायला मिळते.
बेकायदा फ्लेक्स, बॅनर सोबतच सार्वजनिक भिंती, विजेचे खांब आणि झाडांच्या बुंध्यावर अशी भित्तीपत्रके
लावणार्‍यांकडूनही प्रत्येक भित्तीपत्रासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
हा दंड न भरल्यास ज्या व्यावसायीकाची जाहिरात आहे त्याच्या मिळकतीवर बोजा चढविण्यात येणार आहे,
असे माधव जगताप यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून हिरेजडीत सोन्याची अंगठी लंपास

Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’