Pune PMC News | रस्ते खोदाईची कामे 30 एप्रिलपर्यंत उरकावीत; पथ विभागाची सर्व विभागांना सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्या पथ विभागाच्यावतीने १ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय कुठल्याही पद्धतीच्या खोदाईला परवानगी देण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेली खोदाईची कामे ३० एप्रिलपर्यंत पुर्ण करावीत, तर ३१ मे पर्यंत खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी सूचना सर्व विभागाना करण्यात आली आहे. (Pune PMC News)

महापालिकेच्यावतीने पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांची खोदाई करून करण्यात येणारी सर्व कामे बंद ठेवण्यात येतात. याची पुर्वतयारी ही दोन महिने अगोदरच करण्यात येते. प्रामुख्याने दरवर्षी ३० एप्रिलपर्यंतच रस्ते खोदाईला परवानगी देण्यात येते. पुढील महिनाभर खोदाई केलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामासाठी वेळ देण्यात येतो.

साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरू होतो. यानंतर मात्र ३० सप्टेंबरपर्यंत पावसाळ्याचा हंगाम संपत असल्याने अत्यावश्यक दुरूस्तीची कामे वगळता रस्ते खोदाई बंदच राहाते. १ ऑक्टोबरपासून पुन्हा खोदाईची परवानगी देण्यात येते. त्यामुळे सर्व विभागांनी वरिल वेळापत्रकाचा अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)