Pune PMC Property Tax News | महापालिकेने 2019 आकारणी केलेल्या मिळकतधारकांची थकबाकी ‘बिलांमध्ये’ जुन्याच दराने पीटी 3 फॉर्म (PT 3 Form PMC) अपलोड झाल्याशिवाय बिलांमध्ये ४० टक्के सवलत दिसणार नाही : प्रशासनाचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax News | महापालिकेने २०१९ नंतर कर आकारणी झालेल्या मिळकतींना २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून ४० टक्के सवलतीच्या दराने आकारणी केली आहे. परंतू मिळकत धारकांकडून येणार्‍या पीटी ३ फॉर्मनुसार सर्वेक्षणच सुरू न झाल्याने मागील थकबाकी ही शंभर टक्के दरानेच आकारण्यात येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Pune PMC Property Tax News)

महापालिकेने २०१९ पासून रद्द केलेली मिळकत करातील ४० टक्के सवलत पुर्ववत सुरू केली असून त्यानुसार नागरिकांना मिळकत बिले ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. विशेष असे की शासन आदेशानुसार २०१९ पासून आकारणी झालेल्या मिळकतींना १०० टक्के दराने बिले आकारली होती. त्यांना २०१९ पासून ही सवलत लागू करण्यात आली आहे. २०१९ पासून शंभर टक्के बिले भरलेल्या या मिळकत धारकांना पुढील चार वर्षात समान हप्त्यात समान वजावट देण्यात येणार आहे. २०१९ नंतर आकारणी झालेली सुमारे पावणेतीन लाख बिले काल रात्री महापालिकेने उपलब्ध करून दिली. मात्र, ही बिले पाहील्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. (Pune PMC Property Tax News)

या बिलांमध्ये ३१ मार्च २०२३ पर्यंतची थकबाकी ही जुन्याच दराने दिसत आहे. तर १ एप्रिल २०२३ पासूनची वार्षिक कर आकारणीमध्ये ४० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. यामुळे चालूवर्षीची मागणी ४० टक्क्याने कमी झाली असली तरी थकबाकीसह बिले मिळत असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

 

यासंदर्भात कर आकारणी विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले २०१९ पासून आकारणी झालेल्या मिळकत धारकांकडून पीटी ३ फॉर्म भरून घेण्यात येत आहेत. हे फॉर्म आल्यानंतर त्यांची स्क्रुटीनी आणि सर्वेक्षण होईल.
त्यानंतर बिलामध्ये मागील थकबाकीची रक्कम कमी होणार आहे.
ज्या नागरिकांना पहिल्या दोन महिन्यांत बील भरल्यास सर्वसाधारण करामध्ये देण्यात येणारी ५ ते १५ टक्के सवलत
घ्यायची असेल त्यांनी पूर्ण बिल भरावे लागणार आहे.
पीटी फॉर्मच्या तपासणीनंतर पुढील बिलामध्ये प्रत्यक्षात रकमेत वजावट दिसू शकेल. पालिकेच्या या आडमुठया कार्यपद्धतीमुळे मात्र नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे.

 

Web Title :  Pune PMC Property Tax News | 40% discount will not be seen in the bills of the 2019
municipal tax levied by the Municipal Corporation unless
PT 3 Form (PT 3 Form PMC) is uploaded at the old rate in the ‘bills’: Administration claims

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा