Pune – PMPML बस प्रवासात चोरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पीएमपीएल बसप्रवासत चोऱ्या पुन्हा सुरू झाल्या असून, गर्दीचा फायदा घेउन एका जेष्ठ महिलेच्या हातातील ७५ हजारांची सोन्याची बांगडी चोरुन नेल्याची घटना घडली. एकाला पकडण्यात पोलिसांनी एक यश आले असून, एकजण पसार झाला आहे.

मनोहर रमेश माने (वय ३३, सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दापोडी ते खडकी बाजार प्रवासादरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला रविवारी दापोडी ते खडकी बाजार पीएमपीएल प्रवास करीत होत्या. त्यावेळी मनोहरने गर्दीचा फायदा घेउन जेष्ठ महिलेजवळ उभा राहून त्यांच्या हातातील ७५ सोन्याची हजारांची सोन्याची बांगडी कापून साथीदाराकडे दिली. त्यानंतर साथीदाराने पळ काढला. मात्र, बसप्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास उपनिरीक्षक गिरी करीत आहेत.