Pune PMPML Employees – 7th Pay Commission | पीएमपी कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातव्या वेतन आयोगानुसार पूर्ण वेतन; लवकरच 900 बसेस खरेदी करणार

पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Employees – 7th Pay Commission | पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार पूर्ण वेतन देण्यात येईल. तसेच जानेवारी पासूनच्या फरकाची रक्कम पुढील सहा महिन्यांत टप्याटप्य्याने देण्यात येईल. येत्या महिन्याभरात मेट्रोचा विस्तारित मार्ग सुरू होणार असून त्यासाठी 300 मिनीबसेससह 900 बसेस खरेदी करण्यात येईल. तोटा कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचा निर्णय आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune PMPML Employees – 7th Pay Commission)

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, की पीएमआरडीए आयुक्तांना संचालक मंडळावर घेतले आहे. त्यामुळे पीएमपी च्या तोटा भरून देण्यात त्या संस्थेचा शेअर राहणार आहे. पीएमआरडीए ने मागील महिन्यांत 50 कोटी रुपये दिले आहेत. आजच्या बैठकीत सर्वप्रथम कर्मचाऱ्यांची देणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएमपी कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु त्यांना निम्मेच वाढीव वेतन देण्यात येत होते. पुढील महिन्या पासून त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पूर्ण वेतन देण्यात येईल व फरकाची रक्कम पुढील सहा महिने टप्प्याने देण्यात येईल. कर्मचाऱ्यांनी 2017 पासून वेतन आयोग मिळावा अशी मागणी केली आहे. परंतु संस्थेचा 560 कोटी रुपयांचा तोटा पाहता याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आला आहे. (Pune PMPML Employees – 7th Pay Commission)

 

मेट्रो स्टेशन (Pune Metro Station) पर्यंत जाण्यासाठी 300 मिनी बसेस घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून 300 बसेस मिळवण्याच्या तसेच 300 बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या सर्व ई बसेस असतील. त्याचवेळी 300 जुन्या बसेस स्क्रॅप करण्यात येणार आहेत. ई बसेस ची संख्या वाढवत असताना चार्जिंग स्टेशन्ससाठी जागा देण्यात येणार आहेत. ई बसेस ची संख्या वाढत असताना एमएनजीएल चा वापर कमी होत जाणार आहे. एमएनजीएल चा खर्च कमी करणे व इतर अनावश्यक खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केली.
एमएनजीएल, भाडेतत्वावरील बसेसची देणी पुढील टप्प्यात त्या त्या महिन्यात देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.

आकाशवाणी चे पुणे केंद्र बंद करू नये. केंद्र शासनाने या निर्णयाला स्थगिती द्यावी.
सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी केंद्रा कडे
करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद केले.
आकाशवाणी बंद करू नये. सर्वांना विश्वासात घ्या.

 

Web Title :  Pune PMPML Employees – 7th Pay Commission | PMPML employees full salary as
per 7th Pay Commission from July 2023 Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा