Pune PMPML News | फुकट्या प्रवाशांना पीएमपीएमएलचा दणका, दंडाच्या रक्केम मोठी वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करण्यात येणाऱ्या दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. याचा फटका विना तिकीट (Without Ticket) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच बसणार आहे. सुरुवातीला विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 300 रुपये दंड (Fine) वसुल केला (Pune PMPML News) जात होता. मात्र आता दंडाची रक्कम 500 रुपये करण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत 300 रुपये ऐवजी 500 रुपये दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने (Board of Directors) मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या 10 मार्चपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Pune PMPML News)

 

पुण्यात पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत सर्वच जण पीएमपीएमएलने प्रवास करत असतात. मात्र यामध्ये काही प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करत असतात. त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापार्श्वभूमीवर विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना आळा बसेल असा विश्वास महामंडळाला आहे. (Pune PMPML News)

 

‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास
येत्या 8 मार्च पासून तेजस्विनी बसमध्ये महिला प्रवाशांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने दर महिन्याच्या 8 तारखेला महिलांना तेजस्विनी बसमधून मोफत प्रवासाची योजना सुरु केली होती.

खास महिलांसाठी 23 मार्गावर 28 बसेस सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाकाळात ही योजना थांबवण्यात आली होती.
मात्र, आता ही योजना पुन्हा सुरु करण्यात येत आहे.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परिस्थिती सुरळीत झाली आहे.

 

त्यामुळे येत्या 8 मार्च महिला दिनापासून ही योजना पुन्हा सुरु करण्यात येत आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करावा असे
आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune PMPML News | PMPML on without ticket passengers, huge increase in fine amount

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMPML | पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास, 8 मार्च पासून बससेवा पुर्ववत

Pune Traffic Police | येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत नो पार्किंगबाबत नवे आदेश जारी

MLA Sunil Tingare | सिद्धार्थनगर रस्ता बाधितांना हक्काची घरे मिळावीत व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, आमदार सुनिल टिंगरे विधानसभेत मागणी