Pune News : PMPML ची हडपसर ते हिंजवडी फेज-3 मार्गावर दर तासाला ई-बस धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) हडपसर ते हिंजवडी मान फेज 3, (Hadpsar to hinjewadi phase 3) निगडी ते वाघोली (Nigdi to Wagholi) आणि निगडी ते हिंजवडी फेज 3 यासह 11 मार्गावर ई-बस (E-Bus) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस 60, 50 आणि 40 मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येणार आहेत. ही बस सेवा 25 डिसेंबर पासून सुरु करण्यात येणार असून या बसचे तिकीट इतर बसएवढेच असणार आहे.

पुणे शहरात प्रथमच ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या 11 मार्गावर या बसेस प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणार आहेत. प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी, बस लवकरात लवकर नियोजीत ठिकाणी पोहचावी यासाठी या बसला मार्गावरील ठरावीक ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना वेळेत निश्चितस्थळी पोहचता येणार आहे.

हडपसर (भेकराई नगर) ते हिंजवडी मान फेज -3 बस मार्ग क्रमांक 208
महत्त्वाचे थांबे –
भेकराई नगर, हडपसर गाडीतळ, फातिमा नगर, एमजी स्टँड, पुणे स्टेशन, पीएमसी, सिमला ऑफिस, पुणे युनिवर्सिटी, बाणेर फाटा, बालेवाडी स्टेडियम, वाकड ब्रिज, हिंजवडी शिवाजी चौक, फेज – 1, विप्रो सर्कल, टेक महिंद्रा, फेज – 3

प्रवासाचे एकूण अंतर – 38.75 किमी
प्रवासाचे भाडे – 45 रुपये
प्रवासाला लागणारा वेळ – 65 मिनिटे
एकूण बस -4

निगडी ते वाघोली – बस मार्ग क्रमांक 336
महत्त्वाचे थांबे – निगडी भक्ती-शक्ती, पवळे पूल, आकुर्डी चौक, चिंचवड स्टेशन, पिंपरी, कासारवाडी, बोपोडी, खडकी बाजार, डेक्कन कॉलेज, येरवडा, विमान नगर कॉर्नर, खराडी बायपास, साई सत्यम सोसायटी, वाघोली, केसनंद फाटा

प्रवासाचे एकूण अंतर – 31 किमी
प्रवासाचे भाडे – 40 रुपये
प्रवासाला लागणारा वेळ – 50 मिनिटे
एकूण बस – 5