दरोड्याचा बनाव करणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खेड-शिवापूर येथील व्यापाऱ्याचे पाच लाख रुपये दोन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी लांबविल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. हा प्रकार रविवारी (दि.७) रात्री कात्रज चौकातील उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर घडला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादीनेच लुटीचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादीसह तिघांना अटक केली आहे.

गुन्ह्यातील फिर्यादी कल्याणसिंग ज्ञानसिंग राजपुरोहीत (वय-२९ रा. खेडशिवापूर), अर्जुन प्रेमजी बंजारा (वय-३५) आणि प्रकाश रुपसिंग राजपुरोहीत (वय-२३ रा. जांभुळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कल्याणसिंग हा व्यावसायिक असून त्याने दुचाकीवरून आलेल्या तिघांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्याकडील ५ लाख रुपयांची बँग चोरून नेल्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना फिर्यादी कल्याणसिंग याच्यावर संशय आल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी. चौकशी दरम्यान त्याने आपल्यावर दोन ते तीन लाखांचे कर्ज असल्याचे सांगून ते फेडण्यासाठी पैसे लुटण्याचा बनाव केल्याची कबुली दिली. यामध्ये त्याने अर्जून आणि प्रकाश यांची मदत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यातील पैशांची बॅग जप्त केली असून पोलीसांनी चोवीस तासात गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला.

ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्रीधर पाटील, कृष्णा बढे, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव संकपाळ, समीर बागसिराज, सचिन पवार, सर्फराज देशमुख, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, राहुल तांबे, गणेश चिंचकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे करीत आहे.

नाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या

‘या’ खाद्यपदार्थांच्या सेवनाने तुम्ही दिवसभर राहू शकता आनंदी, जाणून घ्या

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा

मनाची एकाग्रता वाढवायची आहे का ? करा ‘हे’ उपाय

हॉटेलमधील ‘फिंगर बाऊलमध्ये’ हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम