Pune : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईताला पोलिसांनी पकडलं, पिस्तूल अन् जिवंत काडतूस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या एका सराईताला पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याचाकडून पिस्तूल व जिवंत काडतूस असा ४० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सूरज उर्फ धनंजय नारायण अडागळे (वय १९, रा. पद्मावती ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सूरज हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, दरोडा, गर्दी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. सराईत सूरज अडागळे पिस्तूलासह रामोशी गेट बसस्टॉपजवळ थांबल्याची माहिती कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल आणि जिंवत काडतूस मिळून आले.

सूरजविरुद्ध सहकारनगर, स्वारगेट, दत्तवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यातंर्गत विविध प्रकाराचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, अमोल पवार, अजय थोरात, वैभव स्वामी, बाबा चव्हाण, अनिल घाडगे, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.