Pune : दरोडा अन् अपहरणाच्या गुन्हयातील फरार सराईताला पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   दरोडा आणि अपहरणाच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकांनी सापळा रचून अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
जनार्धन गणपत गायकवाड (वय 23, रा. खेचरे, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मार्च महिन्यात गायकवाड व त्याच्या साथीदारानी खेचरे गावात बापू दहीभाते यांना अडवून त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वारकरून लुटले होते. त्यांच्याजवळी 51 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. तर दोन महिन्यांनीच पुन्हा एकदा आदेशे व खेचरे गावच्या वेशीवर एका दुचाकी चालकाला अडविले होते. तर त्यांना झाडाला बांधून त्यांच्यावर उलट्या तलवारीने सपासप वार करत पैसे देण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात गायकवाड हा पसार होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. पण तो सापडत नव्हता. यावेळी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे कर्मचारी निलेश शिवतारे, अतुल मेंगे व सुमित ताकपेरे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की पौड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी हा वारजे ब्रिजजवळ आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी याठिकाणी छापा टाकून त्याला पकडले. त्याची खात्रीकरून त्याला पुढील कारवाईसाठी पौड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.