अवैध मटका अड्ड्यावर पुणे पोलिसांचा छापा ; ३९ आरोपींना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध मटका धंद्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून मटका घेणाऱ्या आणि खेळणाऱ्या ३९ जणांना अटक केली आहे. या करवाईत पोलिसांनी ७० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना पर्वती गावातील तावरे बिल्डींगच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय चालु असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छपा टाकला असता १२ आरोपी कल्याण मटका घेताना आढळून आले. तर २७ आरोपी मटका खेळताना पोलिसांनी अटक केली. मामा उंडाळे हा १२ हस्तकांकरवी कल्याण जुगार मटका घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अटक केलेल्या आरोपींना आणि जप्त केलेली रक्कम स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या