Pune : कोयत्यानं सपासप वार करणार्‍या चौघांना अलंकार पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून कोयत्याने सपासप वार करत खुनाचा प्रयत्नकरून पसार झालेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

ओंकार गोरखनाथ थिटे (वय 19), प्रतीक विजय दुडे (वय 19), साहिल पांडुरंग येनपूरे (वय 19), रंगू अंजनेय गुत्तेदार (वय 20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रफिक संकनाळ (वय 22) हा जखमी झाला आहे.

आरोपी थिटे हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. दोन दिवसांपूर्वी फिर्यादी हा गोसावी वस्ती येथुन पायी चालत जात असताना चौघे जण आले. त्यानी फिर्यादी याला अडविले. तसेच किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपी पसार झाले होते.

दरम्यान आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कर्मचारी लांडगे यांना बातमीदारामार्फत आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक कल्पना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक सुरज गोरे, कर्मचारी लांडगे, तांदळे यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.