Pune : नाना पेठेतील व्यावसायिकास खंडणी मागणार्‍याला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नाना पेठ परिसरातील वाहनांचे सुट्टे भाग विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला धमकावत १२ हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी खंडणी मागणाऱ्यास अटक केली आहे. आयनुल अन्वर खान (वय २६,रा. सत्तारखान चाळ, ५५०, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुकानातील कामगाराने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नाना पेठ भागात वाहनांचे सुट्टे भाग विक्री करणाऱ्या दुकानात फिर्यादी कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी खान दुकानात आला. त्याने दुकान मालकाला १२ हजार रुपयांची खंडणी मागितली. मालकाने खंडणी देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून दुकानातील कामगाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या हातातील चार हजारांची रोकड हिसकावून खान पसार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पसार झालेल्या खानला पोलिसांनी शोध घेऊन अटक केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आर. इ. आळेकर करत आहेत.