सराईत दुचाकी चोर खडक पोलिसांकडून अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून 92 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शंकरशेठ रोडवरली धोबी घाट येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात यापूर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सुरज उर्फ पापा रमेश जाधव (वय-१९ रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे), साहिल उर्फ मुन्ना मुनावर शेख (वय-१९ रा. दिपज्योत तरुण मंडळाजवळ, काशेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पंधरा दिवसांपूर्वी भवानी पेठेतील गुरुद्वारा येथून दुचाकी चोरली होती.

वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅक्टीव्हा गाडीसह शंकरशेठ रोडवरील धोबी घाट येथे थांबले असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल रवी लोखंडे आणि विशाल जाधव यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून अ‍ॅक्टीव्हा (एमएच १२ एफई ५३५२), अ‍ॅक्टीव्हा (एमएच १२ सीपी ०१८९), अ‍ॅक्टीव्हा (एमएच १२ एलएफ १३२३) या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, राहुल धोत्रे, रवी लोखंडे, विशाल जाधव, प्रमोद नेवसे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदिप कांबळे, रोहन खैरे, इम्रान नदाफ यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –