Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचं ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’, 1800 हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती

2 पिस्टल, 7 काडतुसे, 12 धारदार हत्यारे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Combing Operation | पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये (Pune Police) वाढ झाली आहे. अनेक परिसरात गाड्यांची तोडफोड करणं (Pune Crime News) आणि अनेक परिसरात दहशत पसरवली जात आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पुणे पोलिसांकडून ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जात आहे.

पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन (Police Stations In Pune) व गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) वतीने ऑल आऊट (Pune All Out Combing Operation) कोम्बिंग ऑपरेशन मोहीम (Pune Police Combing Operation) राबविण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केली. पोलिसांनी शुक्रवारी (दि.14) रात्री 10.00 ते शनिवार (दि.15) पहाटे 2.00 दरम्यान ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन केले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stops In Pune), रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 1824 गुन्हेगारांना चेक कररण्यात आले असून त्यापैकी 577 गुन्हेगार मिळून आले आहेत.

विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये 13 आर्म अॅक्टचे (Arm Act) गुन्हे दाखल करुन 13 आरोपींना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 पिस्टल (Pistol Seized), 7 जिवंत काडतुसे (Cartridges Seized) तसेच 12 धारदार हत्यारे असा एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

परिमंडळ 1 मधील (Pune Police Zone – 1) 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेल्या कारवाईमध्ये गुन्ह्यात निष्पन्न झालेले मात्र अटक नसलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) एक केस करुन एकाला अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबिशन (Prohibition) नुसार तीन केसेस दाखल करण्यात आल्या असून तीन आरोपींकडून 3350 रुपयांचा तसेच जुगार अॅक्ट नुसार दोघांवर केसेस करुन त्यांच्याकडून 3300 रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Pune Police Zone – 2 : परिमंडळ 2 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई

विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न मात्र अटक नसलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत एक केस करुन एका आरोपीला अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबिशन नुसार सात केसेस करुन 7630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार अॅक्टनुसार (Gambling Act) तीन केसेस करुन 3290 रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Pune Police Zonde 3 : परिमंडळ 3 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई

गुन्ह्यात निष्पन्न झालेले मात्र अटक नसलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. याशिवाय प्रोव्हिबिशनमध्ये 11 केसेस करुन 12 आरोपींकडून 6980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार अ‍ॅक्टनुसार दोन केसेस करुन 4 आरोपींकडून 1195 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

Pune Police Zone 4 : परिमंडळ 4 मधील 7 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई

विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ चारमधील सात पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत गुन्ह्यात निष्पन्न झालेले मात्र अटक नसलेल्या 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत एक केस करुन एका आरोपीला अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबिशन नुसार 14 केसेस करुन 9520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार अॅक्टनुसार 11 केसेस करुन 33 आरोपींकडून 22 हजार 445 रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Pune Police Zonde 5 : परिमंडळ 5 मधील 4 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई

प्रोव्हिबिशन अ‍ॅक्टनुसार दोन केसेस करुन दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 1600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एनडीपीएस अ‍ॅक्ट (NDPS Act) मध्ये एक करावाई करण्यात आली असून आरोपीकडून 9500 रुपयांचे 3 ग्रॅम एमडी (MD) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

Pune Police Crime Branch : गुन्हे शाखेने केलीली कारवाई

गुन्हे शाखेने महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत दोन केसेस करुन दोन आरोपींना अटक केली आहे. तर संतोष विनायक नातु Santosh Vinayak Natu (वय-27 रा. पिंपळगाव, ता. दौंड – Daund ) याला अटक करुन दोन गावठी पिस्टल व 7 जिवंत काडतुसे असा एकूण 81 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हडपसर
(Hadapsar Police Station) 3, सहकारनगर (Sahakar Nagar Police Station), भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील
(Bharti Vidyapeeth Police Station) प्रत्येकी एक असे एकूण 5 चेन स्नॅचिंगचे (Chain Snatching) गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याशिवाय दोन आरोपींना अटक करुन 5 घरफोडीचे (Burglary) गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तर एका वाहन चोराला अटक करुन तीन वाहनचोरीचे गुन्हे (Vehicle Theft) उघडकीस आणले आहेत.

खडक (Khadak Police Station), शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station), विश्रामबाग (Vishrambaug Police Station),
सहकारनगर, सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station), वारजे माळवाडी (Warje Malwadi Police Station), पर्वती,
चतु:श्रृंगी (Chaturshringi Police Station), येरवडा (Yerwada Police Station) व विमानतळ पोलीस ठाण्यांनी
(Viman Nagar Police Station) गुन्हेगारांविरुद्ध बेलेबल व नॉन बेलेबल वॉरंट बजावले आहेत.

विशेष मोहिमे दरम्यान प्रोव्हिबीशन अ‍ॅक्ट नुसार गुन्हे शाखेने 6 तर पोलीस स्टेशनने 37 केसेस दाखल करुन 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगार अ‍ॅक्ट अंतर्गत पोलीस स्टेशनने 18 केसेस दाखल करुन 42 आरोपींना अटक करुन जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
तर सीआरपीसी कायद्यांतर्गत (CRPC Act) 24 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली आहे.
तसेच 5 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 390 हॉटेल, ढाबे व लॉज तपासण्यात आले. तसेच 89 एस टी स्टँड, रेल्वे स्थानक,
निर्जन ठिकाणे चेक करण्यात आली. वाहतूक पोलिसांकडून 1057 संशयित वाहन चालकांना चेक करुन 292 जणांकडून
2 लाख 68 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील
(IPS Smartana Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (IPS  Suhail Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ – 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर (Traffic DCP Vijaykumar Magar)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे
कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

Web Title : Pune Police Combing Operation | Pune Police’s ‘All Out Combing Operation’, checks more than 1800 criminals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा