Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून मुंढव्यातील ICICI बँकेचे एटीएम फोडुन चोरी करणार्‍यांना 24 तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-5 ने मुंढवा येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर (ICICI Bank ATM In Mundhwa) फोडणार्‍यांना 24 तासाच्या आत अटक केले आहे. (Pune Police Crime Branch News)

 

भगवान विश्वनाथ सदार Bhagwan Vishwanath Sadar (38, रा. सर्व्हे नं. 9/1, ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव, पुणे. मुळ रा. मु.पो. चतारी, ता. पातुर, जि. अकोला) आणि सुभाष सुरेश सदार Subhas Suresh Sadar (26, मुळ रा. मु.पो. चतारी ग्रामीण रूग्णालयाच्या मागे, ता. पातुर, जि. अकोला – Akola) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 13 जुलै 2023 रोजी पहाटेच्यावेळी मुंढव्यातील केशवनगर येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशिनचे लॉक तोडुन त्यामधील एक्साईड कंपनीच्या बॅटर्‍या चोरी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल आहे. (Pune Police Crime Branch News)

 

दाखल गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखेतील युनिट-5 चे पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार करत होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेथून सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) प्राप्त केले. त्यामध्ये संशयित आढळला. त्याने यापुर्वी मुंढवा, वारजे माळवाडी, चतुःश्रृंगी, ऊरळी कांचन आणि हडपसर परिसरात वेगवेगळया बँकेचे एटीएम फोडून तेथील बॅटर्‍या चोरून नेल्या होत्या.

 

संशयित आणि त्याचा साथीदार हे पांढर्‍या रंगाच्या सॅन्ट्रो कारमधुन चोरी केलेल्या बॅटर्‍या विक्री करण्यासाठी खराडी परिसरातील (Kharadi Area) चौधरी वस्ती येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन त्यांना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. आरोपींनी गुन्हयात वापरलेली गाडी आणि चोरी केलेल्या बॅटर्‍या असा एकुण 1 लाख 59 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

 

आरोपींकडून मुंढवा पोलिस स्टेशन, वारजे माळवाडी पोलिस स्टेशन (Warje Malwadi Police Station), चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन (Chaturshringi Police Station), लोणी काळभोर पोलिस स्टेशन (Loni Kalbhor Police Station) आणि हडपसर पोलिस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) दाखल असलेले एकुण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas Kadam),
सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), पोलिस अंमलदार रमेश साबळे,
दया शेगर, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, प्रताप गायकवाड आणि अमित कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | Pune crime branch arrested those who broke and
stole the ICICI Bank ATM in Mundhwa within 24 hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा