Pune Police Crime Branch News | समाज माध्यमांवर घातक शस्त्रांचा फोटो ठेऊन दहशत निर्माण करणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | समाज माध्यमांवर (Social Media) घातक शस्त्रांचा फोटो ठेऊन परिसरात दहशत निर्माण करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

अर्षद शरीफ पटेल Arshad Sharif Patel (21, रा. आदर्शनगर, तिरंगा चौक, उरळी देवाची, हांडेवाडी, पुणे. मुळ रा. मु.पो. आसु, ता. परांडा, जि. धाराशिव) आणि उमर सलीम शेख Umar Salim Shaikh (19, रा. सय्यदनगर, गल्ली नं. 12, बिल्डींग. 3 मध्ये भाडयाने आणि हडपसर पुणे व आदर्शनगर, तिरंगा चौक, उरळी देवाची, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Police Crime Branch News)

याबाबत अधिक माहिती अशी की, समाज माध्यमांवर घातक शस्त्रांचा फोटो ठेऊन दहशत निर्माण करणारे रेकॉर्डवरील आरोपी हे हडपसर परिसरातील बिराजदार नगर आणि मंहमदवाडी रोडवरील तरवडे वस्ती येथे सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे घेऊन दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील युनिट-5 च्या पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांना समजली. त्यांनी तात्काळ सापळा रचुन आरोपींना अटक केली.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरूध्द अनुक्रमे हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) आणि वानवडी पोलिस ठाण्यात
(Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम
(PI Ulhas Kadam) , पोलिस उपनिरीक्षक चैताली गपाट (PSI Chaitali Gapat), पोलिस अंमलदार अश्रुबा मोराळे, अकबर शेख,
राहुल ढमढेरे, अमित कांबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, दया शेगर आणि पल्लवी मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title :  Pune Police Crime Branch News | The crime branch arrested those who created terror by posting pictures of dangerous weapons on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | वाहनांच्या तोडफोडीसह मोक्काच्या गुन्हयात 3 महिन्यांपासून फरार असलेल्या 3 आरोपींना कर्नाटकमधून अटक; गुन्हे शाखेनं काढली त्यांची धिंड (Video)

Deepika Padukone | दीपिका पादुकोणच्या एअरपोर्ट लूकने वेधले सर्वाचे लक्ष; जवानच्या ट्रेलरनंतर झाली मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

Saiee Manjrekar | महेश मांजरेकरांची मुलगी सईच्या मादक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Bhojpuri Actress Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे साडीतील फोटोशुट व्हायरल