Pune Police MCOCA Action | हडपसर, मांजरी परिसरात दहशत निर्माण करणार्‍या स्वप्नील उर्फ बिट्या कुचेकरसह टोळीतील 8 जणांवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 77 MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | हडपसर (Hadapsar) आणि मांजरी बु. (Manjari) परिसरात दहशत निर्माण करणार्‍या स्वप्नील उर्फ बिट्या कुचेकर आणि त्याच्या इतर 7 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत संघटित गुन्हेगारी करणार्‍यांवर 77 मोक्का कारवाया केल्या आहेत. (Pune Police MCOCA Action)

स्वप्नील उर्फ बिट्या संजय कुचेकर (23, रा. मांजराई मंदिराशेजारी, मांजराईनगर, मांजरी बु., पुणे), पंकज गोरख वाघमारे (28, रा. बंटर शाळेजवळ, गाडीतळ, हडपसर, पुणे) आणि हर्षल सुरेश घुले (23, रा. शिवाजी पुतळया शेजारी, मांजरी बु., पुणे) यांना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे तर त्यांच्या 3 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे (Hadapsar Police Station). त्यांच्यासह दोन फरार आरोपींवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दि. 24 सप्टेंबर 2023 रोजी बिटया कुचेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी स्पिकारचा आवाज कमी कर असे सांगणार्‍याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात हडपसर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Pune Police MCOCA Action)

आरोपींच्या पुर्वीच्या रेकार्डची पाहणी केली असता टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ बिट्या संजय कुचेकर याने साथीदारांच्या मदतीने गुन्हेगारी टोळी तयार करून मांजरी, हडपसर, शेवाळवाडी, लोणी टोल नाका परिसरात टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगुन शरिराविरूध्दचे गुन्हे, दरोडा टाकणे, जबरी चोरी याचा समावेश आहे. कुचेकर टोळीने परिसरात दहशत निर्माण केल्याचे त्याच्याविरूध्द तक्रार देण्यास कोणी समोर येत नव्हते.

कुचेकर आणि त्याच्या साथीदारांविरूध्द मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फतीने अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठविला होता. सदरील प्रस्तावाची छाननी करून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कुचेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

ही कारवाई सीपी रितेश कुमार, ज्वाइंट सीपी संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ritesh Kumar), पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहाय्यक आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली
व.पो.नि. रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) , पो.नि. विश्वास डगळे,
पो.नि. संदिप शिवले, सहाय्यक पो.नि. सारिका जगताप, सहाय्यक पो.नि. सचिन दाभाडे,
पोलिस अंमलदार प्रविण शिंदे, गिरीश एकोर्गे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम शेख,
बाबा शिंदे, अशोक आंधारे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagar ACB Trap Case News | अबब…. 1 कोटीची लाच स्विकारताना सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड
आणि कार्यकारी अभियंता गणेश वाघ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात