Pune Police MCOCA Action | पीएमपी चालकाचा खून करणाऱ्या सोमनाथ कुंभार व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 92 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून पुणे परिवहन महामंडळात (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) चालक म्हणून काम कराणाऱ्या व्यक्तीचा धारदार हत्याराने वार करुन खून (Murder) केला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख सोमनाथ अशोक कुंभार व त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 92 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

राजेंद्र बाजीराव दिवेकर Rajendra Bajirao Divekar (वय 56, रा. जांभुळवाडी) असे खून (Pune Murder Case) झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) सोमनाथ अशोक कुंभार Somnath Ashok Kumbhar (वय 28, रा. टेल्को कॉलनी, जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर Rohit Dilip Patekar (वय 20, रा. गणेश चौक, धनकवडी) या दोघांवर आयपीसी 302, 504, 506(2), 352, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी घडली आहे. आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. (Pune Police MCOCA Action)

आरोपी सोमनाथ कुंभार याने गुन्हेगारी टोळी तयार करुन गंभीर गुन्हे केले आहेत. यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगा, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत माजवणे या सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम
3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील
(IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior PI Vinayak Gaikwad),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक (PI Vijay Puranik), पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर
(PI Girish Dighavkar), सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर, सहायक पोलीस फौजदार चंद्रकांत माने,
पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, विशाल वारुळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पत्नीचा राग लहान मुलीवर, जेवणात चिकन दिले नाही म्हणून मारली वीट; पाषाण परिसरातील घटना

Pune Navale Bridge Accident | वाहनाच्या धडकेत टेम्पो पलटी, तरुणाचा मृत्यू; नवले ब्रिज जवळील घटना

MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात