Pune Police MPDA Action | येरवडा परिसरात दहशत माजविणार्‍या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 75 गुन्हेगार स्थानबध्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | येरवडा परिसरात (Yerawad Police Station) दहशत माजविणार्‍या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. समीर मकरंद सावंत (21, रा. नेताजी शाळेसमोर, सुभाषनगर, येरवडा, पुणे) याला वर्षभरासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) स्थानबध्द करण्यात आले आहे. (Pune Police MPDA Action)

समीर सावंत हा साथीदारांसह येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक
हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, साधी दुखापत, चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे करीत होता.
गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्यावर 4 गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील
सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल म्हणून नागरिक त्याच्याविरूध्द उघडपणे तक्रार देण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam) यांनी समीर सावंतवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedare) यांनी प्राप्त प्रस्तावाच्या कागदपत्रांची पडताळणी केली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी समीर सावंतला 1 वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.

पोलिस आयुक्तांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणार्‍या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर
आतापर्यंत एमपीडीए अंतर्गत 75 कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा
घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Anti-Encroachment Drive | आंबेगाव येथील अनधिकृत 11 इमारतींवर महापालिकेचा हातोडा, 500 सदनिका उध्वस्त

Pune Police MPDA Action | हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 76 वी स्थानबध्दतेची कारवाई

Bharat Todkari Passed Away | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार भारत तोडकरी यांचे निधन

वकिलांच्या फ्लॅटमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; दोघीही म्हणतात मी त्यांची सहायक

Pune Pimpri Accident News | ताम्हिणी घाटात बसला भीषण अपघात, २ महिलांचा मृत्यु, ५५ जखमी