मदतीसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मदतीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याची घटना चतुःश्रुगी भागात घडली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून केली. अमर बबन जगताप (वय ३९, रा. जनवाडी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नितीन पवार यांनी चतुःशृगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पवार हे रात्रपाळीला बीटमार्शल तैनात होते. त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षातून रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास जनवाडी येथील पचपांडव येथे गोंधळ सुरू असल्याबाबत कॉल आला. त्यावेळी पवार आणि त्यांचे सहकारी कळसकर जनवाडीतील पांडव हौसिंग सोसायटीत गेले. त्यावेळी अमरने त्यांच्याशी हुज्जत घालून जागेवरच तक्रार घेण्याची मागणी करीत त्यांची कॉलर पकडली. त्यांचे सहकारी यांना दगड मारला. अधिक तपास सहायक निरीक्षक समीर चव्हाण करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like