पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग, दुचाकी अडवून धक्काबुकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यात कचरा टाकल्याबाबत हटकले म्हणून पोलिस कर्मचाऱ्याचा दोन दुचाकीवर पाठलागकरून धक्काबुकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊन काळात रस्त्यावर कचरा टाकत असताना त्यांना कारवाई करू असे म्हणल्याने हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई अमित जाधव यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हे सहकारनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. दरम्यान ते धनकवडी स्मशान भूमी पाठीमागील रस्त्याने जात होते. त्यावेळी काहीजण कोरोना आजाराच्या काळात तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे दिसले. त्यावेळी कर्मचारी जाधव यांनी त्यांना हटकले. तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हणल्यानंतर त्यांनी जाधव याना धमकावले. ते पोलीस मदत घेण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असताना मात्र आरोपी त्यांच्या दुचाकीवर पाठीमागून पाठलाग करत आले. त्यांना हत्ती चौकात त्यांच्या दुचाकीला दुचाकी आडव्या लावून गाडी अडविली. तसेच

त्यांना शिवीगाळ करत धक्काबुकीं केली. तसेच तू माझ्यावर कारवाई करतोस काय, थांब तुला दाखवतो असे म्हणून धमकावले. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. अधिक तपास सहायक निरीक्षक एस. पी. पाटील हे करत आहेत.