Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

पुणे : Pune Police News |लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police, Pune) अटक केली. त्याला १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे (First Class Magistrate S. J. Dolare) यांनी दिला.(Pune Police News)

संदीप बळिराम वाघमारे (वय २९, रा. वरळी पोलिस मुख्यालय, मूळ रा. लातुर) असे पोलिस कोठडी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत २७ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपी पोलिसाने चार जानेवारी ते १७ जुलै २०२० या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून तर त्यानंतर २० मे २०२१ पर्यंत लग्न झाले आहे, असे सांगून तरुणीशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर तिच्या आई-वडिलांकडून अडीच लाख रुपये रोख आणि अडीच तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाघमारे याला बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, तसेच वाघोली, कांजूरमार्ग, लातुर, पनवेल या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तेथे जाऊन तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे (Assistant Public Prosecutor Dnyaneshwar More) यांनी केली.

हे देखील वाचा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

Mumbai-Kolhapur Special Train | मुंबई-कोल्हापूर विशेष सेवा सुधारित क्रमांक व संरचनेसह धावणार

Rupali Chakankar । ‘बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो’; ‘या’ दांपत्याला राष्ट्रवादीचा खोचक टोला

JOB | दिल्लीच्या AIIMS मध्ये नोकरीची संधी, मिळणार एक लाख पगार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Police News | Rape of 27-year-old girl, police custody of a police officer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update