पुणे : पालखी बंदोबस्ता दरम्यान ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पालखी बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

मिलिंद मकासरे असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मकासरे हे लष्कर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यांना आज बंदोबस्त असल्याने ते दुचाकीवरून पहाटे ५ च्या सुमारास निघाले होते. फातिमानगर जवळ गेल्यावर क्रोमाच्या समोर भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. ट्रकचे चाक मकासरे यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मकासरे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति
डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे
कोलेस्टरॉलने त्रस्त असल्यास करा ‘हे’ उपाय
वेदनेकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका,अन्यथा होऊ शकतात गंभीर समस्या