…म्हणून गुन्हे शाखेच्या Addl CP पदाचा अतिरिक्त कार्यभार बच्चन सिंह यांच्या वर तर Jt CP पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. सुपेकर यांच्याकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराच्या सह पोलीस आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

तसेच अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाचा कार्यभार हा पूर्व विभागाचे अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सोपवला आहे. तर गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार हा गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्याकडे असणार आहे.

तीनही अतिवरिष्ठ अधिकारी रुग्णनिवेदन सुट्टीवर गेल्याने हा कार्यभार या अधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.

You might also like