पुण्यात संचारबंदीचे तब्बल 278 गुन्हे, होऊ शकते 6 महिन्याची ‘जेल’वारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रथम जमावबंदी आणि नंतर संचारबंदीत पोलिसांनी तबल 278 जनांवर कारवाई केली आहे. या काळात 4 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास तसेच रस्त्यावर फिरण्यास मनाई असताना शहरात अश्या प्रकारे फिरणाऱ्यावर पोलिसांनी 188 नुसार कारवाई केली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन केला आहे. तर पुण्यात 144 कलम लागू करत जमावबंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र, यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहिर केली. संचारबंदीत 4 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. तर रस्त्यावर फिरण्यास देखील मनाई असते. परंतु अत्यावश्यक वस्तू आणि मेडिकल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

त्यानंतर पुणे पोलिसांकडून शहरातील नागरिकांना घराबाहेर म पडण्याचे आवाहन केले होते. तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने वाहने वापरण्यास बंदी घातली. मात्र त्यांनंतर देखील काही बेजबाबदार नागरिक बाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी अश्या 278 जणांवर कारवाई केली आहे. 19 ते 26 मार्च या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर 188 नुसार कारवाई केली गेली आहे.

परिमंडळनुसार कारवाई

परिमंडळ १– ५५
परिमंडळ २– ८२
परिमंडळ ३– २५
परिमंडळ ४– ६६
परिमंडळ ५– ५०
एकूण——-728

होऊ शकते 6 महिने कैद

संचारबंदीत पोलीस 188 नुसार कारवाई करून त्याबाबत न्यायालयात खटला दाखल करतात. यानंतर न्यायालय जास्तीत जास्त 6 महिने कारागृहात रवानगी करू शकते. त्यामुळे नागरिकांनी बिनकामाचे बाहेर न पडलेले हिताचे ठरणार आहे. अन्यथा 6 महिने कारागृहात बसण्याची वेळ येऊ शकते.