Pune : पत्रकाराच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास दीड वर्षानंतर जेरबंद करण्यात पोलिसांना यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिरवळ येथे पत्रकारावर सत्तूर व चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

शफीक रफिक शेख (वय २१, रा. कात्रज) असे त्याचे नाव आहे. ही घटना ११ एप्रिल २०१९ रोजी शिरवळ येथे घडली होती. तेव्हापासून शेख फरार होता. शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल हे घरी जात असताना रात्री दोन दुचाकीवरून सहा हल्लेखोर आले. पटेल यांच्या दुचाकीला गाडी आडवी लावून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यातील चार हल्लेखोरांनी गाडीतून उतरून पटेल यांच्यावर वार केले. पटेल यांच्या हातावर व पाठीवर सत्तूरने वार करून हल्लेखोर पळून गेले होते. शिरवळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

हल्लेखोरांपैकी शफीक शेख हा कात्रज येथील घरी आला असल्याची माहिती मिळाल्यावर सातारा पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले.

You might also like